Rohit Pawar Tweet : नागरी उड्डाण मंत्र्यांवर रोहित पवारांचा घणाघात! ट्वीटमधून सगळचं काढलं; नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar Tweet : आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांवर घणाघाती टीका करत लक्ष वेधून घेणारे ट्वीट केले आहे.

Rohit Pawar Tweet : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ट्वीट करत त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या संसदेतील उत्तरावर संताप व्यक्त केला. “मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे ‘थातूरमातूर’ आणि वेळ मारून नेणारे उत्तर संपूर्ण देशाने बघितलं.” असल्याचे ते म्हणाले.
जर बारामती विमान दुर्घटनेतील ‘ब्लॅकबॉक्स’ सुरक्षित आहे, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले? ब्लॅकबॉक्स हा कोणत्याही विमान अपघातातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. तो सुरक्षित असतानाही जळाल्याची खोटी माहिती का दिली गेली, याचे उत्तर मंत्र्यांनी तातडीने द्यावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. Rohit Pawar Tweet
पुढे ते म्हणाले, VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? त्यामुळे मंत्री आता त्या ‘मिठाला’ जागून चौकशीत पारदर्शकता टाळत आहेत का? याचे स्पष्ट उत्तर मंत्र्यांनी द्यावे, असे देखील रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar Tweet

Rohit Pawar
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याबाबत काय उत्तर येते हे पाहावे लागेल. या प्रकरणाची तीव्रता वाढत असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांत राज्य आणि केंद्रातील विविध नेत्यांची भेट घेत अपघात प्रकरण लावून धरले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण ट्वीटमुळे या प्रकरणाने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. Rohit Pawar Tweet
अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही… pic.twitter.com/B33mnsqPoR
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 17, 2026
रोहित पवारांचे ट्वीट Rohit Pawar Tweet
अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत.
VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे!





