Rohit Pawar : अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघातात निधन झाले. अनेकांकडून हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. मात्र, मुंबईत गुन्हा दाखल न झाल्यामुळे ते बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले. बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोन तास ठाण मांडून बसल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवारांनी (Rohit Pawar) संताप व्यक्त केला. त्यानंतर पत्रकार परिषदमध्ये आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधला. “राज्यात पुण्यातील कबुतरे चोरीला गेल्याचा एफआयआर दाखल होतो, परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संशयास्पद मृत्यूचा एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत,” असे म्हणत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारण करायचं असतं तर केलं असतं. आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. पण आमच्या काकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा एफआयआर घेण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सह्या केल्या आहे. आम्ही चार चार पुस्तके वाचली. वकिलांनी सांगितलं तरी एफआयआर दाखल करून घेतला जात नाही. Rohit Pawar Rohit Pawar At Baramati Police Station: अजितदादा जर तुमचे मित्र होते तर त्यांचा एफआयआर का घेतला जात नाही. उद्या आम्हाला काय झालं तर त्याचं काय होणार. जनतेचं काय होणार. काल उरळी कांचनला १६० कबुतरे चोरीला गेले. त्याचा एफआयआर झाला. पण दादांचा एफआयआर होत नाही. हा कसला नाय. एफआयआर होत नसेल तर यात काळंबेरं नाही का? मी एवढेच म्हणेल कुणाचा तरी दबाव आहे. जेव्हा अंत्यविधी झाला होता तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आताही आम्ही सांगताना ते भावूक झाले. पण त्यांचा पेन एफआयआरवर वळत नाही. याचा अर्थ त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. सत्तेतील लोकांना ते नको असेल.” रोहित पवार म्हणाले की, काल मुंबईत आणि आज बारामतीत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. आम्ही सर्व कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम सांगितले, तरीही पोलीस एफआयआर घेण्यास तयार नाहीत. बारामती पोलिसांचे हात कुणीतरी बांधले आहेत,” असा दावा त्यांनी केला. Anupama Singh: “काश्मीरचे बजेट IMF च्या निधीपेक्षा जास्त…”; संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूतांनी PAK-IOC वर केली टीका VSR कंपनी आणि बड्या नेत्यांचे लागेबांधे यावेळी रोहित पवारांनी थेट ‘एव्हिएशन’ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी आरोप केला की, व्हीएसआर (VSR) कंपनीचे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यासह केंद्रीय एव्हीएशन मंत्र्यांशी जवळचे संबंध आहे. डीजीसीएने दोन दिवसांपूर्वीच व्हीएसआरची ५ विमाने ग्राऊंडेड केली आहेत. जर या विमानांमध्ये तांत्रिक दोष होता, तर मग तेच विमान अजित दादांना का दिले गेले? डीजीसीए केवळ तांत्रिक तपास करते, गुन्हेगारी स्वरूपाचा नाही. त्यामुळे सीआयडी असो वा सीबीआय, या प्रकरणाचा फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. हेही वाचा: Walmik Karad : कृष्णा आंधळे अद्यापही फरार, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाबाबत कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश