Sunil Tatkare : विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय; सुनील तटकरेंची प्रतिक्रिया समोर म्हणाले…
Sunil Tatkare : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा विमान अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Tatkare : २८ जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. अखेर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात १० जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत तपशिलावर माहिती दिली. या स्फोटक पत्रकार परिषदेतून त्यांनी अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
विमान अपघाताचा तपशिल देत असताना रोहित पवार यांनी अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आले होते का? विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले? असे सवाल उपस्थित केले. त्यांनी व्यक्त केलेल्या संशयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत सरकारने अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करून देशासमोर ही भूमिका मांडावी ह्या संदर्भातील मागणी राष्ट्रवादीने केली आहे, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. तसेच अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या, असेही तटकरे म्हणाले. रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही, असे म्हटले होते. यावर सुनील तटकरेंनी युरोपीयन कंपनीकडे तपास दिला होता का? कुणी फोन केला? ते मला माहिती नाही, असे म्हटले आहे.
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप विमान कंपनीवर केले आहेत. आतापर्यंत १३ ते १४ दिवसात काहीही तपास झाला नाही. याचा फक्त सीसीटीव्ही गोळा केला, पण त्यावर काहीही झालं नाही. त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे.
…तर विमान अपघात झालाच नसता
विमान अपघातातबाबत बारामतीत ILS सिस्टिम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं आहे. या आधी याच कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का? तसं जर झालं नसतं तर आज अजितदादांचा अपघात झालाच नसता हे नक्की. असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा :Satara Crime : शाळांच्या बाहेर नेमकं काय विकलं जातंय? रक्षक प्रतिष्ठानचा धक्कादायक खुलासा






