Rohit Pawar On Eknath Khadse । चार वर्षांपूर्वी खडसे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे घरवापसी म्हणजेच भाजपमध्ये परतणार आहेत. स्वतः खडसे यांनी याबाबत खुलासा करत लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याच म्हंटल आहे.
मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच यावेळी शरद पवार यांच्याबाबत बोलताना खडसे म्हणाले, ”मी शरद पवार यांचा ऋणी राहील त्यांनी मला संकटकाळात मदत केली.” तसेच आगामी पंधरा दिवसात मी दिल्लीत भाजपात प्रवेश करेल असं देखील खडसे यांनी यावेळी म्हंटले. । Rohit Pawar On Eknath Khadse
माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. जे पी नड्डा यांची देखील भेट दिल्लीमध्ये घेतली असल्याची माहिती खडसेंनी दिली आहे. दरम्यान, यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, भाजपवर हल्लाबोल केला आहे.
खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं. खडसे साहेबांची तब्येत खूप खराब आहे.
अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकते. भाजपने असे खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे. । Rohit Pawar On Eknath Khadse
फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरलेत
ते पुढे म्हणाले की, फडणवीस साहेब आता वैतागले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून देखील विनोद तावडे साहेबांकडे महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातले सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन कमी होत आहे. फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले खडसे भाजप प्रवेशाबाबत ?
माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. जे पी नड्डा यांची देखील भेट दिल्लीमध्ये घेतली असल्याची माहिती खडसेंनी दिली. शरद पवार यांच्याबाबत बोलताना खडसे म्हणाले,”मी शरद पवार यांचा ऋणी राहील त्यांनी मला संकटकाळात मदत केली.” असं ते म्हणाले. । Rohit Pawar On Eknath Khadse