डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या विधानावर रोहित पवारांचा आक्षेप; थेट पोस्ट अन् व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

Rohit Pawar : भारत पाकिस्तान देशांमध्ये लष्करी कारवाई थांबल्या असून काल रात्री भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला संबोधित केले. त्यांच्या संबोधनाअगोदर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइटव्हाउसमध्ये एक धक्कादायक विधान केले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली नसती तर अणुयुद्ध झालं असतं आणि लाखो लोकांचे प्राण गेले असते असे विधान ट्रम्प यांनी सोमवारी व्हाइट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
तसेच दोन्ही देश अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहलचे आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारामगाे व्यापर हे एक महत्वाचे कारण राहिले असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. एकप्रकारे युद्धविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली. यामुळे त्यांच्या या विधानावर आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच ट्रम्प यांच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारे तर आहेच शिवाय ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्माने बघत एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे. यामुळे भारताची जागतिक प्रतिमा, भारताचे सार्वभौत्व, दहशतवादाविरुद्धाची लढाई याला ठेच पोचत असल्याने ट्र्म्प यांचे विधान भारतीय मनाला पटणारे नाही, असे रोहित पवार म्हणाले आहेत. याविषयी त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत ट्रम्प यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
“युद्धविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली आणि युद्ध थांबवल्याचे,” डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारे तर आहेच शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्म्याने बघत एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे. यामुळे… pic.twitter.com/CmaYtkGfGt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 13, 2025
काल संध्याकाळी पंतप्रधानांच्या देशाला संबोथित करण्याच्या अर्धा तास आधी डोनाल्ट ट्रम्प यांनी हे धक्कादायक विधान केले असता पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती. संपूर्ण देश, सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत, परंतु अमेरिकेसारखा देश असली विधाने करत असाताना केंद्र सरकार याबाबत बोलत नसेल तर हे मात्र, ट्रम्प यांच्या विधानाहून अधितक दुःखद आहे, या संवेदनशील विषयांवर चर्चा करणे सद्यस्थितीत योग्य नसले तरी केंद्र सरकारला या प्रश्नांची उत्तरे देशाला द्यावीच लागतील, शक्य तेवढ्या लवकर केंद्र सरकारने अधिवेशन बोलावून जनतेला सत्य सांगितले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.





