Rohit Pawar Met Uddhav Thackeray : रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; नेमकी काय झाली चर्चा?
Rohit Pawar Met Uddhav Thackeray : अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवण्यास सहकार्य करण्याची रोहित पवारांची उद्धव ठाकरेंना विनंती

Rohit Pawar Met Uddhav Thackeray : आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित करत आहेत. याचदरम्यान रोहित पवारांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची ‘मातोश्री’ निवास्थानी भेट घेतली. अजित पवार यांच्या अपघाताबाबत उद्धव ठाकरे यांच्यांशी 45 मिनिटे चर्चा केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात जमा केलेल्या सर्व पुराव्यांबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आणि दादांना न्याय मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवण्यास सहकार्य करण्याची विनंती केली. Rohit Pawar Met Uddhav Thackeray
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA आणि VSR यांची मिलीभगत आहे. CBI कडे 18 दिवस पत्र देऊन झालं तरी काही झाले नाही. तसेच महाराष्ट्रात FIR का होत नाही याबाबत उद्धव ठाकरेंनी पण आश्चर्य व्यक्त केल्याचे रोहित पवार म्हणाले. तर मोठ्या पक्षाचे नेते म्हणून या तपासात गती यावी आणि न्याय मिळावा यासाठी सोबत राहण्याचे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचेही रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar Met Uddhav Thackeray
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी जमा केलेल्या सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती त्यांना दिली आणि संसदेत या विषयावर आवाज उठवण्याकामी सहकार्य करण्याची विनंती केली. महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक… pic.twitter.com/gPyGO9akEj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 4, 2026
या भेटीनंतर रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी जमा केलेल्या सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती त्यांना दिली आणि संसदेत या विषयावर आवाज उठवण्याकामी सहकार्य करण्याची विनंती केली.
महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून या विषयाच्या निष्पक्ष चौकशीकामी आणि अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत केलेल्या कामालाही उजाळा देण्यात आला. पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.”
हेही वाचा:






