Rohit Pawar : पार्थ पवार यांनी व्हीएसआर विमानातून प्रवास केला. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्या शेजारी बसल्याने या विषयावर कुणाशीही चर्चा करायची इच्छा नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे(शप) नेते रोहित पवार यांनी केले आहे. (Rohit Pawar) सुनेत्रा पवार यांनी जर दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी लावली तर त्यांचा सत्कार करेन, असेही रोहित पवार म्हणाले. दिवंगत अजित पवार यांचे अपघात प्रकरण रोहित पवार यांनी सातत्याने लावून धरले आहे. (Rohit Pawar) काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर विमानातून प्रवास केल्याचे समोर आले. याच कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवारांचा अपघात झाला होता. (Rohit Pawar) तर दुसरीकडे, या विमानाच्या मालकाचे आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांचे संबंध असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्याशेजारी बसल्याचे दिसून आले. (Rohit Pawar) Rohit Pawar : …तर सुनेत्राकाकींचा मी सत्कार करेन; रोहित पवारांचं मोठं विधान त्यानंतर आमदार रोहित पवारांनी त्यावर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आता या दोन्ही विषयांवर प्रतिक्रिया देत, आमदार रोहित पवार म्हणाले, या विषयावर मी कुणाशीही चर्चा केली नाही, तशी इच्छादेखील नाही. (Rohit Pawar) अजितदादांच्या अपघाताचा प्रश्न घेऊन आम्ही न्यायालयात जात आहे, सीआयडीकडे जात आहोत. लोकांपर्यंत जाऊन प्रामाणिकपणे लढत आहोत. असे असताना या गोष्टी समोर दिसतात त्यावेळी आम्ही लढायचे की नाही असा प्रश्न पडतो. (Rohit Pawar) अजितदादांच्या अपघाताची केस जर येत्या 28 मे पर्यंत राज्य सरकारने सीबीआयला सुपूर्त केली तर मी स्वतः सुनेत्राकाकींचा सत्कार करेन, असे रोहित पवार यांनी म्हटले. (Rohit Pawar) हेही वाचा Rohit Pawar : रोहित पवार यांनी घेतली राज्यपालांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी