रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक; म्हणाले “निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील…”

Rohit Patil Facebook Page Hack| माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. यावरुन काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येत आहेत. याबाबत स्वत: रोहित पाटील यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर यासंदर्भातील पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. याशिवाय त्यांनी या वृत्तीचा निषेध व्यक्त केला आहे.
माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले असून काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. सदर अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आपण सर्वांनी सदर ची पोस्ट रिपोर्ट करावे अशी विनंती आहे.
निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील लोकांचे अकाउंट हॅक होताना सर्वत्र दिसत असून मी या… pic.twitter.com/yV4irbW9Pl
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) April 26, 2024
रोहित पाटील यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले असून काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. सदर अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आपण सर्वांनी सदरची पोस्ट रिपोर्ट करावे अशी विनंती आहे. निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील लोकांचे अकाउंट हॅक होताना सर्वत्र दिसत असून मी या वृत्तीचा निषेध करतो.’ Rohit Patil Facebook Page Hack|
माझे युवा सहकारी आणि स्व. आर. आर पाटील (आबा) यांचा वारसा चालवणारे रोहित पाटील यांचं face book पेज ऐन निवडणुकीच्या काळात दुसऱ्यांदा हॅक झालं. यावर पडणारा चुकीचा मजकूर आणि आक्षेपार्ह फोटो हटवून पेज रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असून या चुकीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करावं!…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 26, 2024
यानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी देखील याबाबत ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ‘माझे युवा सहकारी आणि स्व. आर. आर पाटील (आबा) यांचा वारसा चालवणारे रोहित पाटील यांचं फेसबुक पेज ऐन निवडणुकीच्या काळात दुसऱ्यांदा हॅक झालं. यावर पडणारा चुकीचा मजकूर आणि आक्षेपार्ह फोटो हटवून पेज रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असून या चुकीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करावं,’ असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. Rohit Patil Facebook Page Hack|
हेही वाचा:
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत; शिवसेना विरुद्ध शिवसेना रंगणार सामना





