पिंपरी | रोहित नागलगांव यांना पीएच.डी. प्रदान

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – माउंटन एज ॲडवेंचर्स ॲंड वाईल्ड ट्रेल्स संस्थेचे रोहित नागलगाव यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. रोहित नागलगाव यांनी ‘एक्स सिटु कंजर्वेशन ऑफ़ एंडेंजर्ड महासिर इन इंद्रायणी रिव्हर, पुणे, इंडिया’ या विषयावर आपला शोधप्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता. मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रतील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांचे नागलगाव यांना मार्गदर्शन लाभले.
या संशोधन कामात डॉ. प्रविण सप्तर्षी, डॉ. शशांक ओगले, डॉ. सुधाकर इंदुलकर आदी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. रोहित नागलगांव यांनी या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर केले आहेत.
इंडियन सायन्स यूथ कॉंग्रेस परिषदेमधे मौखिक सादरीकरणामधे तृतीय क्रमांक व इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लनरी कॉन्फरन्स ऑन ईमर्जिंग ट्रेंड्स इन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी मधे त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
रोहित हे मागील १५ वर्षापासून गिर्यारोहण व निसर्ग संवर्धन कार्यात उल्लेखनीय काम करत असल्याचे माउंटन एज ॲडवेंचर्सचे अनिल जाधव यांनी सांगितले. या संस्थेचे गिर्यारोहक मनोज राणे, मंदार थरवल व सर्व सभासद यानी रोहित नागलगाव यांच्या यशाचे कौतुक केले आणि संस्थेच्या माध्यमातून पुढील कार्यास शभेच्छा दिल्या आहेत.





