विम्बल्डन – ग्रासकोर्टवरील सम्राट म्हणून ख्यातनाम असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी व स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला पराभूत करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फेडरर 12 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. फेडररने नदालला 16 वेळा पराभूत केले आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत त्याच्यासमोर नोव्हाक जोकविच याचे आव्हान असून जोकोविचला फेडरर पराभूत करणार का, याची उत्सुकता सर्व क्रीडाप्रेमींना लागली आहे.
उपांत्य फेरीसाठी सेंटर कोर्टवर झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत फेडररने नदालचा 7-6, 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये रॉजर फेडरर आणि नदाल यांनी एकदम कडवी लढत दिली. हा सेट फेडररने टाय ब्रेकमध्ये जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये नदालाचा खेळ बहरला. त्याने चिवट झुंज देत फेडररची सर्व्हिस दोनवेळा ब्रेक केली. त्याने हा सेट 6-1 ने जिंकला. त्यामुळे या सामन्यात रंगत निर्माण झाली. मात्र, पुढील दोन्ही सामन्यात पुन्हा एकदा फेदररने वर्चस्व सिद्ध करत 6-3 व 6-4 ने नदालचा पराभव केला.
Roger Federer defeats Rafael Nadal in four sets to book #Wimbledon final clash against Novak Djokovic. (file pic) pic.twitter.com/YARL5EURsc
— ANI (@ANI) July 12, 2019
विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्याची फेडररची ही 12 वी वेळ आहे. 37 वर्षीय फेडररने आतापर्यंत आठवेळा बिम्बल्डन जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची फेडररची ही 31 वी वेळ आहे.