नगर -रस्तालूट करुन जबर मारहाण करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरीपूल येथून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवार रोजी करण्यात आली.
प्रसाद बाबासाहेब चेडवल (रा. गुंजाळी, ता.राहुरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, 17 फेब्रुवारी 2020 रोजी अमित अर्जुन साळवे (वय-28, सेल्स ऑफिसर, रा. पानसवाडी, ता. नेवासा) हे शिंगवेतुकाई शिवारात नवीन बांधकाम चालू असलेल्या पेट्रोल पंपाच्याजवळून जात असताना त्यांच्या दुचाकी मागून दोन दुचाकींवर आलेल्या चार व्यक्तीनी साळवे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांच्याकडून 4 हजारांची रोख रक्कम व 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा प्रसाद चेडवल याने केला आहे व तो पांढरीपुलाजवळ आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोहेकॉ. संदीप घोडके, पोना. रवींद्र कर्डिले, पोना. संतोष लोढे, पोना. रवी सोनटक्के, पोकॉ. मेघराज कोल्हे, पोकॉ. किरण जाधव, पोकॉ. कमलेश पाथरुट, पोकॉ. सागर सुलाने, पोकॉ. मयुर गायकवाड यांनी सापळा रचवून ताब्यात घेतले. तसेच हा गुन्हा विकास बाळू हानवत (रा. कात्रड, ता. राहुरी) व विकास हानवत याच्यासह मिळून केल्याचे सांगितले.