मुंबई – ए आर रेहमान हे नाव आता फक्त भारतापुरत मर्यादित राहिलेलं नसून विदेशातही या नावाचे अनेक चाहते आहेत. आपल्या दर्जेदार संगीताच्या जोरावर रेहमानने आपली ओळख चित्रपट इंडस्ट्रीमध्ये बनवली आहे. सुरुवातील साऊथ चित्रपटांमधून संगीत द्यायला सुरुवात केल्यानंतर ए आर रेहमान हे वादळ बॉलिवूडमध्ये आलं होत.संगीतासोबतच रेहमानने गायलेली गाणी देखील जगप्रसिद्ध झाली आहेत. म्हणूनच कॅनडा या देशाने एक मोठा निर्णय घेतल्याचे समजते.
भारतात चित्रित झालेला आणि ऑस्कर मिळालेला स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाने ए आर रेहमानला विदेशातही चाहता वर्ग मिळवून दिला. रेहमानच्या याच कलागुणांचा गौरव म्हणून कॅनडाच्या एका रस्त्याचे नाव त्याच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याआधी 2013 मध्ये एका रस्त्याला एआर रहमान यांचे नाव देण्यात आले होते. त्याचबरोबर दुसऱ्या रस्त्याला 2022 मध्ये सिटी ऑफ मार्कहॅममधील रस्त्याला रेहमानने नाव देण्यात आले आहे.
City of Markham (in Canada) honours music maestro AR Rahman by naming a street after him.
“Honoured and grateful for this recognition from City of Markham and Mayor Frank Scarpitti and the people of Canada,” AR Rahman tweets.
(Pic 1 – file pic of AR Rahman) pic.twitter.com/exwGnBZIhB
— ANI (@ANI) August 29, 2022
हा सन्मान मिळाल्यानंतर रेहमानने कॅनडातील अधिकाऱ्यांचे आभार मानत एक ट्विट केले आहे. तसेच यावेळी पार पडलेल्या समारंभाचे फोटो देखील ट्विट केले आहेत. या आधी देखील भारतातील दिग्गज व्यक्तिमत्वांची नावे विदेशातील रस्त्यांना देण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यात सचिन तेंडुलकरसह इतर काही भारतीय खेळाडूंचा देखील समावेश होता.
Honoured and grateful for this recognition from @cityofmarkham and @frankscarpitti and the people of Canada 🇨🇦 🇮🇳 #arrahmanstreet #markham #canada #infinitelovearr #celebratingdiversity pic.twitter.com/rp9Df42CBi
— A.R.Rahman (@arrahman) August 29, 2022