Riyan Parag Slams Commentators for personal comments : आयपीएल २०२६ च्या प्ले-ऑफची शर्यत कमालीची चुरशीची झाली असतानाच, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने मैदानाबाहेरील एका मोठ्या विषयावर थेट तोफ डागली आहे. टीव्ही समालोचक (कॉमेंटेटर्स) आणि क्रिकेट तज्ज्ञांकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर परागने उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “समालोचकांनी खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याला लक्ष्य करण्याऐवजी फक्त आणि फक्त मैदानातील क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करावे,” अशा कडक शब्दांत रियान परागने आपला संताप व्यक्त केला आहे. “वैयक्तिक आयुष्यात डोकावू नका”- नुकत्याच झालेल्या सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रियान परागने समालोचकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, “समालोचक जेव्हा टीव्हीवर एखाद्या खेळाडूबद्दल चांगले किंवा वाईट बोलतात, ते थेट करोडो लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांच्या मनावर त्याचा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे समालोचकांनी कोणतीही वैयक्तिक टिप्पणी करण्यापूर्वी गांभीर्याने विचार करायला हवा. खेळाडूंना त्यांच्या मैदानाबाहेरील गोष्टींसाठी नाही, तर त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी ओळखले पाहिजे आणि त्यांना योग्य तो सन्मान मिळायला हवा.” पातळी सोडून टीका करणे चुकीचे – Riyan Parag Slams IPL Commentary, Says “Talk More About Cricket” Riyan Parag urged IPL commentators to “talk more about cricket” instead of focusing on drama and outside narratives during matches. pic.twitter.com/Qozu4rBokZ — Cricket Hub (@Anurag9793) May 20, 2026 आपली बाजू मांडताना पराग पुढे म्हणाला की, “आम्ही खेळाडू म्हणून मैदानावर आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो, ज्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. कधीकधी संघ कमी धावांवर बाद होतो किंवा आमच्याकडून चुका होतात, कारण शेवटी आम्हीही माणूस आहोत. पण, केवळ खराब कामगिरी झाली म्हणून खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य मध्ये ओढून त्यांच्यावर पातळी सोडून टीका करणे पूर्णपणे चुकीचे आहे.” हेही वाचा – Sanju Samson Story : चेपॉकवरील हायव्होल्टेज वादानंतर संजू सॅमसनने सोडलं मौन; सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने वेधलं जगाचं लक्ष! ‘कीबोर्ड वॉरियर्स’ला रियान परागचे सडेतोड उत्तर – सोशल मीडिया आणि टीव्हीवरील टीकेचा खेळावर परिणाम होतो का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “गेल्या काही वर्षांत मी एक गोष्ट नक्की शिकलोय की, मी काहीही केले तरी बाहेरील जग माझ्याबद्दल बोलणारच. पण, या ‘कीबोर्ड वॉरियर्स’च्या (सोशल मीडियावरील टीकाकार) बोलण्याने माझ्या खेळावर, फॉर्मवर किंवा माझ्या मानसिकतेवर काहीही परिणाम होत नाही. मी माझे पूर्ण लक्ष केवळ माझ्या क्रिकेटवर केंद्रित ठेवतो.” प्ले-ऑफच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात कर्णधार रियान परागने थेट समालोचकांना दिलेल्या या इशाऱ्यामुळे आता क्रिकेट वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.