पिंपरी | उघड्या ड्रेनेजलाइनमुळे अपघाताचा धोका
Updated On:

थेरगाव, (वार्ताहर) – पद्मजी मिलच्या समोरून सांडपाणी वाहिनी गेली आहे. या वाहिनीवरील संरक्षक झाकणे काही ठिकाणची गायब झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणार्या नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथील ड्रेनेजलाइन त्वरित दुरुस्त करून मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
थेरगावमधील पद्मजी मेलच्या जवळील ड्रेनेजलाइनची चार ते पाच ठिकाणी झाकणे गायब झाली आहेत. येथेच दुचाकी पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच पादचार्यांना ये-जा करणार्याचा मार्ग आहे.
त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना रात्रीअपरात्री अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरातील ड्रेनेजलाइनची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे.





