पिंपरी | फिडर पिलर जमिनीखाली गेल्याने अपघाताचा धोका
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – आकुर्डी इंडस्ट्रिअल इस्टेटजवळ फिडर पिलर जमिनीखाली गेल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात बॉक्समध्ये पाणी घुसून विद्युत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण प्रशासनाने वेळी उपाययोजना करून अप्रिय घटना रोखावी, अशी उद्योजकांकडून मागणी होत आहे.
आकुर्डी येथील इंडस्ट्रियल इस्टेटजवळील एक फिडर बॉक्स जमिनीखाली गेला आहे. परिणामी हा बॉक्स जमिनीच्या उंचीलगत आला आहे. सध्या शहर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्याच्या घटना होत आहेत.
पावसाने जोर धरल्यास या बॉक्समध्ये पाणी शिरल्यास या भागात विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदयस्थितीत या बॉक्सचे झाकणदेखील तुटल्याने धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.





