Rishi Panchami 2025: आज ऋषी पंचमी! तिथीनुसार करा सप्तऋषींचे पूजन

Rishi Panchami 2025: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी ही तिथी ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. यावर्षी हे व्रत २८ ऑगस्ट २०२५ रोजी साजरे केले जात आहे. या दिवशी सप्तऋषींची विशेष पूजा केली जाते.
पंचांगानुसार पंचमी तिथी २७ ऑगस्ट दुपारी ३.४४ वाजता सुरू झाली असून ती २८ ऑगस्ट संध्याकाळी ५.५६ वाजेपर्यंत राहणार आहे. उदयतिथीनुसार ऋषी पंचमी आज, २८ ऑगस्टला पाळली जात आहे.
पूजेचा शुभ मुहूर्त
ऋषीपंचमी पूजेचा मुहूर्त सकाळी ११.०५ ते दुपारी १.२८ पर्यंत आहे. या काळात पूजा केल्यास विशेष पुण्य लाभते.
व्रत व पूजा विधी
या दिवशी महिला-पुरुष दोघेही व्रत करतात. व्रतामध्ये दिवसभर एकच वेळ जेवण केले जाते.
घरातील पूजाघर स्वच्छ करून सप्तऋषी, कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ यांची पूजा केली जाते.
हळद-कुंकवाने चौकोनी मंडल तयार करून सप्तऋषींची मूर्ती किंवा चित्र ठेवले जाते.
त्यांना वस्त्र, चंदन, फुले, फळे अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो.
शेवटी ऋषीपंचमी व्रत कथा वाचन केले जाते. कथा वाचल्याशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते.
मंत्र जपाचे महत्त्व
या दिवशी सप्तऋषींच्या स्मरणार्थ विशेष मंत्र जप करण्यालाही महत्त्व दिले जाते. यामुळे ऋषींचे आशीर्वाद लाभतात, असे मानले जाते.परंपरेनुसार या दिवशी केलेली पूजा आणि व्रत यामुळे पापक्षालन होते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते, असे धार्मिक मान्यता आहे.





