जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ; 24 तासात दोन हल्ले
Updated On:

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील बिजबेहारा पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफ पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक कर्मचारी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांतील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
याबाबत काश्मीर पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून माहिती दिली आहे. पोलिसांनी अनंतनागच्या बिजबेहारा भागात दहशतवाद्यांनी पोलिस/सीआरपीएफ यांच्या सयुक्त नाका पथकावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्या कर्मचाऱ्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून दहशतवाद्याचा शोध सुरू आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.





