राहुरी – राहुरी तालुक्यातील उंबरे येथे बुधवारी रात्री लव्ह जिहाद प्रकरणातून क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलींचे फोटो काढल्याच्या कारणातून एका गटाने दुसऱ्या गटाला जाब विचारला. त्यातून झालेल्या बाचाबाचीतून भांडणे विकोपाला गेली. यावरून गावातील वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी 50 जणांवर दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दरोडा, धार्मिक भावना दुखावणे आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. संशयित बारा जणांना अटक केली असून राहुरी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका नाजूक कारणावरुन दोन गटात दुपारी बाचाबाची झाल्या होत्या. वरिष्ठांनी या प्रकरणी समझोता करण्याची भूमिका घेतली होती.मात्र रात्री आठच्या सुमारास एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला करत तोडफोड, दगडफेक करत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे उंबरे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दंगल करणाऱ्या अनेक तरुणांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथे काल एका नाजूक कारणावरुन दुपारपासून दोन गटात हमरीतूमरी चालू होती.रात्री नऊ वाजे दरम्यान त्या ठिकाणी 100 ते 150 जणांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला. या हल्ल्यात उंबरेत काही दुकानांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. तसेच काही तरूणांना बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस पथकाने रात्रभर कोंबिग ऑपरेशन करून दंगल करणाऱ्या दहा तरूणांची धरपकड करत ताब्यात घेतले. सध्या उंबरे परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने त्या ठिकाणी छावणीचे स्वरूप आले आहे. तर उंबरे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. उंबरे येथे झालेल्या मारहाणीत तीन तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर व पुणे येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
सलीम वजीर पठाण (रा.उंबरे) यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र रायभान मोहिते (वय 25, रा.गणेशवाडी सोनई, ता.नेवासा), गणेश अशोक सोनवने (वय 21, रा.श्रीरामवाडी, सोनई, ता. नेवासा), शेखर बाळासाहेब दरंदले (वय 30, रा. त्रिमुखे थिएटर सोनई, ता.नेवासा), सचिन विजय बुऱ्हाडे (वय 25, रा. शिवाजी चौक, राहुरी), नवनाथ भागीनाथ दंडवते (वय 36 , रा. ब्राम्हणी ता. राहुरी), संदीप भाऊसाहेब लांडे (वय 32, रा. लांडेवाडी सोनई, ता.नेवासा), शुभम संजय देवरे (वय 25 रा. स्टेशन रोड, राहुरी), सुनिल उत्तम दाभाडे (वय 26 , रा. क्रांतीचौक कातोरे गल्ली, राहुरी), मारुती बाळासाहेब पवार, (वय 22, रा. निंभारी, ता. नेवासा),प्रतिक प्रकाश धनवटे (वय 29, रा. तनपुरे गल्ली, राहुरी). या दहा जणांना अटक केली असून 15 जण पसार झाले आहेत. पोलहस पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे.
या घटने बाबत राहुरी पोलहस ठाण्यात भादंवि कलम 295, 295 (अ), 143, 147, 148, 149, 427 क्रिमीनल लॉ. अमेंटमेंट 2013 चे कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37, (1), (3), 135 प्रमाणे दरोडा, दंगल, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. पकडलेल्या आरोपींना आज राहुरी येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांत्वन करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल केल्याचे एका गटाचे म्हणणे आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली.