रिंकू सिंगवर बीसीसीआयची बंदी

नवी दिल्ली – परवानगीशिवाय अनधिकृत टी-20 लीगमध्ये खेळल्याबद्दल बीसीसीआयने भारतामध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगवर बंदीची कारवाई केली आहे. त्याच्यावरील बंदीचा कालावधी हा एक जूनपासून सुरू होईल.

बीसीसीआयच्या परवानगीशिवाय रिंकूने अबुधाबी येथील मान्यता नसलेल्या एका टी-20 लीगमध्ये सहभाग घेतला होता. बीसीसीआयच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला बाहेरील देशांमधील टी-20 लीग खेळण्यासाठी बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. रिंकूने ही परवानगी घेतली नसल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत रिंकू भारतात कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळू शकणार नाही.

रिंकू सिंग हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘अ’ संघांमध्ये होणाऱ्या मालिकेत संघातील भाग होता मात्र, या निलंबनामुळे रिंकूला या सामन्यात खेळता येणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)