Asha Upcoming Marathi Movie Official Trailer: अभिनेत्री रिंकू राजगुरुने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसते. तसेच ती सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी रिंकूने एक प्रकारचे घट्ट नाते तयार केले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात असते. रिंकू आता एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काही दिवसांपूर्वी ‘आशा’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला टीझरमध्ये ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ ही लक्ष वेधून घेणारी टॅगलाईन देण्यात आली आहे. या चित्रपटात रिंकू आरोग्य आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. टीझरमध्ये सायकलवर बसून ती गावागावांतील लोकांपर्यंत पोहोचते, अशी काही झलक दाखवण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाविषयी खूप कुतहल निर्माण झाले होते. अखेर आशा चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून दाखविण्यात येणार आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरुने साकारलेल्या आशाचे अनेक पैल प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायाला मिळणार आहे. या चित्रपटात रिंकूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक दिपक पाटील यांनी आशा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या 19 डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, टीझर, गाणं आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. रिंकूचे चाहते तिला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. हेही वाचा : राष्ट्रपती भवनात पुतिन यांना देण्यात आलेला ‘गार्ड ऑफ ऑनर’ नेमका काय असतो? ; वाचा सविस्तर