समानतेच्या भूमिकेतून महिलांना अधिकार,डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – महिलांबाबतच समाजातील दुजाभाव कमी होण्यासाठी समाजाचा चष्मा बदलण्यासंदर्भात आपण सर्वांनी काम करावे. सर्व माणसे समान आहेत याच समानतेच्या भूमिकेतून महिलांना अधिकार मिळाले आहेत. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या विषमतेचे समर्थन करत असतील तर त्याविरोधात आपण जाणिवपूर्वक काम केले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजीत महिला स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात त्या बोलत होते. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रातील दक्षता समितीच्या महिलांचे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात घ्यावयाची काळजी. तसेच उपाययोजना बाबत प्रशिक्षण पार पडले. स्वयंसेवक महिलांचा सन्मान डॉ. गोऱ्हे आणि जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश शेलार यांनी प्रास्ताविक तरा अनिता शिंदे सुत्रसंचालन केले.





