एड्स दिनानिमित्त वेश्याव्यवसायातील महिलांसाठी ‘मार्ग हक्काचा, सन्मानाचा’ कार्यक्रम

पुणे – बुधवार पेठेत मागील १९ वर्षांपासून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या रेव्ह. हरीभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठानतर्फे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून ‘मार्ग हक्काचा, सन्मानाचा’ या विशेष थीमवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान, प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी सारिका लष्करे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “समाजाच्या दुर्लक्षित घटकांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांद्वारे या घटकांना नवा आत्मविश्वास आणि समाजाचा स्वीकार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
तर आपल्या कृतीतून आणि विचारांतून समानता आणि आदर यांची शिकवण रुजवूया. एकत्रितपणे कार्य करून आपण एचआयव्ही/एड्समुक्त आणि सन्मानाने जगणाऱ्या समाजाची उभारणी करू शकतो, असे मत ॲड. श्रीकांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेने आपल्या समर्थकांचे आणि सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले, ज्यामध्ये संवाद फाउंडेशन, अलका ताई, सीमा ताई, आरतीताई, अमोल कांबळे, आकाश ससाणे, सागर भाऊ, चेतन भाऊ, तसेच सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेडगे यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.





