रिद्धिमा पंडितने वाढदिवसानिमित्त घेतला मोठा निर्णय; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Riddhima Pandit | टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडितने नुकताच 35 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त तिने आपले डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलारांनी आपले डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा समावेश आहे. आता या यादीत रिद्धिमाचेही नाव जोडले गेले आहे.
रिद्धिमा पंडितने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यात आय डोनर कार्ड आणि सर्टिफिकेट दिसत आहे. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी आतापर्यंत केलेल्या सर्व स्वाक्षऱ्यांपैकी, मला सर्वात जास्त अभिमान अवयवदान कार्डवर केलेल्या स्वाक्षरीचा आहे. आज वाढदिवसानिमित्त मी एक छोटेसे पाऊल उचलले आहे. मी माझे डोळे दान करण्याचे वचन दिले आहे. जे एक दिवस दुसऱ्याचे जग उजळवू शकते. मला खूप आनंद होत आहे की माझे डोळे माझ्या जाण्यानंतर कोणाच्या तरी आयुष्याला प्रकाशित करतील.” Riddhima Pandit |
View this post on Instagram
“दृष्टी ही एक देणगी आहे आणि ती माझ्यानंतरही टिकू शकते हा विचार नम्र आणि आशादायक आहे. मला खरोखर विश्वास आहे की अवयव दान ही केवळ वैयक्तिक निवड नाही. ती एक जबाबदारी आहे जी आपण सर्वजण मानव म्हणून सामायिक करतो. तुम्ही सुद्धा एखाद्याला पुन्हा सूर्योदय पाहण्याचे कारण व्हा,” असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. रिद्धिमाच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. Riddhima Pandit |
रिद्धिमा पंडितला ‘बहू हमारी रजनीकांत’ या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. ती ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये देखील झळकली होती. Riddhima Pandit |
हेही वाचा :

