पुणे : राजाराम ब्रिज ते वडगाव ब्रिज दरम्यान संतोष हॉल परिसरात आज सकाळी रिक्षा आणि चारचाकी वाहनामध्ये किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. अपघातानंतर काही काळ वाहतूक मंदावली होती. मात्र, पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने दोन्ही वाहनं रस्त्यावरून हटवण्यात आली असून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचे कारण समजून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.