Richest Citizens। भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल विरोधाभासांनी भरलेली आहे. एकीकडे आपण २०२३-२४ या आर्थिक वर्षात उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील जोमदार कामगिरीने जीडीपीतील वाढ ८.२ टक्के असल्याचे सांगून आपल्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतो. दुसरीकडे अतिश्रीमंत भारतीय – ज्यांचा महसूल वाढीत, रोजगार निर्मितीत आणि एकूण जागतिक दृष्टीकोन तयार करण्यात मोठा वाट असतो असे नागरीक भारत सोडण्याचे नियोजन करत असतात. कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि अर्न्स्ट अँड यंग (इवाय) यांनी एकत्रितपणे केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ इनडिव्हिज्युअल्स (अल्ट्रा-एचएनआय) म्हणजेच ज्यांच्याकडे २५ कोटी रुपयांच्यापेक्षा (सुमारे तीस लाख अमेरिकी डॉलर) जास्त संपत्ती असणाऱ्या पाचजणांपैकी एकजण परदेशी स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेत आहे किंवा त्यासाठी नियोजन करत आहे, अशी स्थिती आहे. संपत्ती निर्माण करणारे भारत का सोडत आहेत? Richest Citizens। कोटक-इवाय च्या अहवालातून असे दिसून येते की अतिश्रीमंत भारतीय स्थलांतर करत असण्यामागे तीन प्रमुख मुद्दे आहेत. १) अधिक चांगली जीवनशैली आणि चांगल्या पायाभूत सुविधांची उपलब्धता परदेशात आहे. २) अधिक चांगल्या आरोग्य सुविधा आणि शिक्षणाच्या संधी ३) उद्योग-व्यावसायिकांना अनुकूल कररचना, कायदे आणि व्यवसायक पूरक वातावरण. हे लोक केवळ अलिशान जीवनशैलीसाठी त्याठिकाणी जात नाहीत तर भारतातील सार्वजनिक सोयीसुविधा आणि आवश्यक ते धोरणात्मक पाठबळ नसल्याने ते असमाधानी असल्याचे यातून सूचित होते. अतिश्रीमंतांचे जाणे – भारताच्या वाढीवरील डाग Richest Citizens। दृष्टीक्षेपात विचार केला तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ८.२ टक्के वाढीच्या दराने भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. मात्र, त्यामुळे या वाढीत योगदान असलेल्या घटकांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी ते प्रेरणादायक ठरत नसल्याने विकासाची गोष्ट बाजूला पडते.