आपल्या अभिनयाचे सर्वाचं मन जिंकणारा अभिनेता ह्रतिक रोशन सध्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. या आधी बॉलीवूडचे अनेक चित्रपट त्याने गाजवले आहेत. आता मात्र मोठी झेप घेण्याच्या तयारीत ह्रतिक दिसतो आहे.
हॉलीवूडपटात एका गुप्तहेराच्या भूमिकेसाठी त्याने नुकतंच ऑडिशन दिले आहे. त्याची देहबोली पाहता त्याला सिनेमात घेण्याच्या तयारीत दिग्दर्शक दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने स्वत:वर मेहनत घेत हे ऑडिशन दिले होते.
ह्रतिकचं धारदार नाक, मोहित करणारी देहबोली अनेकांना भूरळ पडावी असं व्यक्तीमत्व असलेल्या ह्रतिकने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर एक एक चित्रपट करत तो अनेकांच्या मनावर राज्य करु लागला.
त्याने आत्मसाद केेलेल्या नृत्यशैलीमुळे तो विशेष प्रसिद्ध आहे. अनेक नवोदित नृत्यदिग्दर्शक ही डान्सस्टाईल फॉलो करताना नेहमीच दिसतात. जस्ट डान्स या कार्यक्रमातून त्याने अनेकांना डांन्सचे धडे दिले.