मुंबई – तुरूंगातील दिवस हे रियासाठी अवघड होते. तुरूंगात तिने स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी योगाची मदत घेतली. तसेच तिने तुरूंगातील कैद्यांना देखील योगा शिकवीला असे रियाचे वकील अॅड. मानेशिंदे यांनी
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील सांगितले.
मी़डियानं रियाचा प्रचंड पाठलाग केला होता. तिच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवलं जात होतं. त्यामुळे ती कोणत्या अवस्थेत तिथं राहतेय हे पाहण्यासाठी गेलो होतो. तसेच कोरोनामुळे तिला घरचं जेवण दखील मिळत नव्हतं.
इतर कैद्यांप्रमाणेच ती तिथं राहत होती. यापुढे तिच्यावर आरोप करून तिला
संकटात ओढणाऱ्या प्रत्येकाशी लढण्यासाठी मी तयार आहे असे म्हणत अॅड. मानेशिंदे यांनी रियाचा बंगालची वाघीण असा उल्लेख केला.
बाॅलिवूड अभिनेता सुसातसिंह राजपूत मृत्यू प्रकरण व ड्रग्ज प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. मागील एक महिन्यापासून रिया भायखळा येथील तुरूंगात होती. काल ती घरी परतली आहे.