चिंबळी -मेदनकरवाडी (चाकण, ता. खेड) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची करोनाच्या काळातही 6 हजार 500 ते 10 हजार 500 इतकी मोठी पगारवाढ केली आहे. त्याचा लाभ 18 कर्मचाऱ्यांना होणार आहे. इतर ग्रामपंचायतींच्या तुलनेत ही अधिक पगारवाढ असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. या वेतनवाढीचा धनादेश सरपंच प्रियांका मेदनकर-चौधरी, उपसरपंच दिपीका गोरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या वरिष्ठ लिपिक रेखा भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच रामदास मेदनकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, नंदाराम भुजबळ, जगदीश मेदनकर, छाया भुजबळ, जयश्री भुजबळ, ग्रामविकास अधिकारी अरूण हुलगे, सुभाष भुजबळ, पांडुरंग लष्करे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.