महसूल मंत्र्यांची गाडी अडविली
Updated On:

पुणे – सारथी संस्थेच्या स्वायतता अबाधित ठेवण्यासाठी व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मराठा क्रांती (मूक) मोर्चा यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची गाडी अडविण्यात आली.
यावेळी राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, बाळासाहेब अमराळे, राकेश भिलारे, अमर पवार, मीना जाधव, दीपाली पाडळे, विनय ढेरे, प्रवीण गोगावले, मंगेश जाधव, सौरभ अमराळे यांनी निषेधाचे फलक दाखविले.





