Revati Lele Wedding : अभिनेत्री रेवती लेले अडकली विवाहबंधनात; पारंपरिक लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष
Revati Lele Wedding : . नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या आणि हातात हिरवा चुडा अशा मराठमोळ्या लुकमध्ये रेवतीचे सौंदर्य अधिकच खुलले

Revati Lele Wedding : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले आज लग्नबंधनात अडकली . पुण्यात पारंपरिक पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला. रेवतीनं तिचा जोडीदार कौशिक भिडे याच्यासोबत आयुष्याची नवीन सुरुवात केली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नासाठी रेवतीनं पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या आणि हातात हिरवा चुडा अशा अस्सल मराठमोळ्या साध्या लुकमध्ये रेवतीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तर तिचा पती कौशिकने लाल आणि पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोषाख परिधान केला होता. रेवतीच्या या आनंदात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रेवतीनं सोशल मीडियावर साखरपुड्याची अंगठी दाखवत करत प्रेमात पडल्याची कबुली दिली होती, मात्र आपल्या होणाऱ्या पतीचा चेहरा आणि नाव गुलदस्त्यात ठेवला होतं. आज लग्नानंतर कौशिक भिडे यानं स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत “हे यू” असं कॅप्शन दिलं, ज्यावर रेवतीनं “हॅलो हसबंड” अशी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे. Revati Lele Wedding
रेवती लेलेच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ‘स्वामिनी’ मालिकेतील रमाबाई पेशवे या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होते. तिनं हिंदी मालिकेतही भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत तिने मधूराणी म्हणून नकारात्मक भूमिका साकारली. तर नुकतीच ती ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत दिसली होती. Revati Lele Wedding
हेही वाचा:





