Revanth Reddy on Modi। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानशी अलिकडच्या संघर्षाला हाताळण्यात त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप रद्दी यांनी केला आहे. हैदराबादमध्ये जय हिंद यात्रेपूर्वी एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री रेवंत यांनी ही टीका केली आहे. जाहीर सभेला संबोधित करताना रेवन्त रेड्डी यांनी,”देश आपल्या शहीद सैनिकांवर आणि नागरिकांवर शोक करत असताना भाजप युद्धाचा वापर राजकीय खेळी म्हणून करत आहे.” असा आरोप केला. तसेच रेड्डी यांनी युद्धाच्या निकालावर मोदी सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “चार दिवसांच्या युद्धानंतर काय झाले? कोणी आत्मसमर्पण केले? आम्हाला माहित नाही.” त्यांनी आरोप केला की युद्धाचा शेवट भारताने नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला.” याविषयी पंतप्रधानांचे मौन का आहे ? असा सवाल यावेळी रेड्डी यांनी केला. युद्धबंदीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक न बोलावल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती याची आठवण करून दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, “तुम्हाला आमची गरज असताना तुम्ही आम्हाला बोलावले. आम्ही सैन्यासोबत उभे राहिलो. पण युद्ध संपवताना तुम्ही आम्हाला समाविष्ट केले नाही.” त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरील भाजपच्या वक्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीएम रेड्डी यांनी विचारले, ‘पाकिस्तानने किती राफेल विमाने नष्ट केली?’ “याबद्दल कोणी का बोलत नाहीये?’ नागरिक आणि राजकीय पक्षांची वारंवार मागणी असूनही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यात अपयश आल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. युद्ध म्हणजे फक्त भाषणे देणे नाही Revanth Reddy on Modi। मोदी सरकारची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाशी करताना रेड्डी यांनी, ‘युद्ध म्हणजे फक्त भाषणे देणे नाही. ते धैर्य, दृढनिश्चय आणि रणनीती आहे.’ असे म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी १९७१ चे युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती हे निर्णायक नेतृत्वाचे उदाहरण म्हणून उद्धृत केले. ते म्हणाले, ‘अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबा दिला तेव्हाही इंदिरा गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि भारताने १९७१ चे युद्ध जिंकले. त्या युद्धात आपण केवळ जिंकलो नाही तर पाकिस्तानचे विभाजन केले आणि बांगलादेशची निर्मिती केली आणि त्यांना योग्य उत्तर दिले. पण आज चीनने आमच्या ४,००० चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे, सूर्यपेटचे आमचे सैनिक कर्नल सुरेश बाबू यांना ठार मारले आहे आणि आमचे पंतप्रधान गप्प आहेत.’असे म्हणत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणले असते Revanth Reddy on Modi। रेवंत रेड्डी यांनी पीओकेविषयी भाष्य करताना,”राहुल गांधी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती. “जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणले असते. मोदी हे १००० रुपयांच्या बंदी घातलेल्या नोटेसारखे आहेत.” असे म्हटले. आपल्याला राहुल गांधींसारखे नेते हवे आहेत. मोदी आपल्यासाठी कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत. पंतप्रधान म्हणून फक्त राहुल गांधीच ते करू शकतात.”असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. त्यांनी सांगितले की राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान काँग्रेसने सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांनी भाजपच्या तिरंगा रॅलींवरही टीका केली आणि विचारले की ,”ह्या रॅली खरोखरच पहलगाम हल्ल्यातील बळी आणि युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जात आहेत का.? लोकांना अजूनही इंदिरा गांधी आठवतात पुढे ते म्हणाले, “ही तुमच्या पक्षाची वैयक्तिक बाब नाही. ती देश आणि तिथल्या लोकांबद्दल आहे.” रेवंत रेड्डी म्हणाले की ‘जय हिंद यात्रा’ सशस्त्र दलांशी एकता दर्शवते, ज्यांचे मनोबल मोदी सरकारच्या कृतींमुळे घसरले आहे. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना विचारले, ‘तुम्ही काँग्रेसवर टीका का करत आहात? १९६७, १९७१ च्या विजयासाठी? की आता तुम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल?’ म्हणूनच भारताच्या कानाकोपऱ्यातील लोकांना अजूनही इंदिरा गांधींची आठवण येते. १९६७ मध्ये जेव्हा चीन युद्धासाठी आला तेव्हा तिने चीनला गुडघे टेकवले आणि धडा शिकवला. आता मी भाजपला विचारू इच्छितो की, “तुम्ही काय करत आहात? तुम्ही घोषित केलेल्या युद्धात पाकिस्तानने आपल्या देशातील ३३ लोक मारले. तुम्ही काय करत आहात?”असे काही सवाल यावेळी रेड्डी यांनी उपस्थित केले.