Shikhar Dhawan On Retirement :- मी वयाच्या १८ किंवा १९ व्या वर्षी खेळायला सुरुवात केली. राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी मला देशांतर्गत क्रिकेटच खेळायचे नव्हते. मागे वळून पाहिले तर गेल्या दोन वर्षांमध्ये मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळातच नव्हतो, मी फक्त आयपीएलच खेळत होतो, त्यामुळेच मी निवृत्ती पत्करली, असा खुलासा भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने केला. भारताचा सलामीवीर असलेल्या शिखर धवनने ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय व ६८ टी-२० लढतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३८ वर्षांच्या शिखर धवनने 24 ऑगस्ट 2024 रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. शिखर धवनने २०२१ मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपद स्वीकारले तेव्हा तो भारताचा २५ वा एकदिवसीय कर्णधार बनला होता. त्याने कर्णधार म्हणून भारताचे १२ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यापैकी ७ लढतींमध्ये भारताने विजय मिळविला होता, तर ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. भारताचा युवा फलंदाज असलेल्या शुभमन गिल सातत्याने देशांतर्गत खेळताना दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात प्रवेश करण्यासाठी उत्सुक होता. यावेळी निवड समितीने शिखरच्या जागी शुभमन गिलची निवड केली. शिखरने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०२२ साली खेळाला होता. २०२२ नंतर जेव्हा मी मागे वळून पाहिले, तेव्हा मी आंतरराष्ट्रीय संघात स्वतःला पाहात नव्हतो. या काळात मी देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो नाही. मी केवळ आयपीएलमध्येच स्वतः पाहात होतो, त्यामुळे हीच निवृत्तीची योग्य वेळ असल्याचे मला जाणवले आणि मी त्यानुसार निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शिखरची आयपीएलमधील कामगिरी सलामीवीर असलेल्या शिखर धवनने आयपीएलमध्ये विविध संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने २२२ आयपीएल सामन्यांमध्ये २ शतके व तब्बल ५१ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ६७६९ धावांचा करताना ७६८ चौकार लगावले आहेत. कोणत्याही फलंदाजाने शिखर एवढे चौकार मारलेले नाहीत. त्यामुळे ७६८ चौकार लागावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये सलग २ शतके झळकाविण्याचा पराक्रम देखील केला आहे. Vinesh Phogat : नाडाने विनेश फोगटला बजावली नोटीस, 14 दिवसांत मागितले उत्तर, जाणून घ्या…काय आहे प्रकरण आंतरराष्ट्रीय कारकिर्द… त्याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 44.11 च्या सरासरीने आणि 91.35 च्या स्ट्राइक रेटने 6793 धावा केल्या, ज्यात सात शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आणि 11 अर्धशतकांसह 27.92 च्या सरासरीने आणि 126.36 च्या स्ट्राइक रेटने 1759 धावा केल्या. 34 कसोटी सामन्यांमध्ये धवनने 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत.