नवी दिल्ली – उत्सवानंतर नोव्हेंबर महिन्यात इतर क्षेत्रातील विक्री काही प्रमाणात कमी झाली असली तरी वाहन विक्री वाढली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी सांगितले की सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री वाढल्यामुळे वितरकांनी ग्राहकांना विकलेली वाहन विक्री नोव्हेंबर महिन्यात दोन टक्क्यांनी वाढून 33,00,832 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 32,31,526 युनिट होती. नोव्हेंबर महिन्यात प्रवासी वाहन विक्री 20 टक्क्यांनी वाढून 3.9 लाख युनिट झाली आहे. त्यामुळे वितरकाकडील इन्व्हेंट्री 53 ते 55 दिवसांपासून कमी होऊन 44 ते 46 दिवसांवर आली आहे. दुचाकीची विक्रीवर तीन टक्क्यांनी वाढून 25.46 लाख युनिट झाली. व्यावसायिक वाहन विक्री 20 टक्क्यांनी वाढून 94,935 युनिट झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 24 टक्क्यांनी वाढून 1.33 लाख युनिट झाली. ट्रॅक्टर विक्री 57% टक्क्यांनी वाढून 1.26 लाख युनिट झाली. ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढली आहे. त्याचबरोबर जीएसटी कपातीने वाहने स्वस्त झाल्यामुळे ही विक्री वाढत आहे.