Retail inflation: किरकोळ महागाईत किंचित वाढ; खाद्यान्न व प्रोटीनयुक्त पदार्थ महागल्याचा परिणाम

Retail inflation – डिसेंबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई किंचित वाढून 1.33% इतकी नोंदली गेली आहे. रिझर्व बँकेने महागाईचा दर चार टक्क्याच्या आत रोखण्याचा संकल्प केला असतानाच गेल्या अनेक महिन्यापासून किरकोळ महागाईचा दर कमी पातळीवर आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून रिझर्व बँकेने व्याजदरात सव्वा टक्क्याची कपात केलेली आहे.
प्रोटीन युक्त पदार्थाच्या किमती वाढल्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचा दर काही प्रमाणात वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचा दर 0.31% होता. सप्टेंबर महिन्यामध्ये हा दर 1.44% इतका होता. त्यामुळे किरकोळ महागाईचा दर सध्या तीन महिन्याच्या उच्चांकावर असल्याचे दिसून येते.
खाद्यांनाबरोबरच वैयक्तिक वापराच्या वस्तू, मसाले, डाळी व मटन, मासे अंडी इत्यादीच्या किमती वाढल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. खाद्यांप्पाची महागाई डिसेंबर महिन्यात वाढून उणे 2.71 टक्के भरली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये हा दर उणे 3.91% इतका होता. त्यामुळे एकूणच आकडेवारीवर परिणाम झाला असल्याचे विश्लेषकांनी या संदर्भात बोलताना नमूद केले.
दरम्यान किरकोळ महागाईचा दर अजूनही 4% पेक्षा कितीतरी कमी म्हणजे केवळ 1.33% इतका नोंदला गेला आहे. त्यामुळे गरज पडल्यास रिझर्व बँक व्याजदरात आणखी एक वेळ कपात करण्याची शक्यता खुली आहे. मात्र रिझर्व बँकेने या अगोदर सव्वा टक्क्याची व्याजदर कपात केलेली आहे. त्यापैकी फक्त 0.32% चा फायदा व्यावसायिक बँकांनी किरकोळ ग्राहकांना करून दिलेला आहे. त्यामुळे अगोदरच्या व्याजदर कपातीचा ग्राहकांना पुरेसा फायदा झालेला नाही. पुढील पतधोरणावेळी व्याजदर कपात टाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारताचा विकासदर पहिल्या आणि दुसर्या तिमाहित मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेवर विकास दर वाढविण्यासाठी व्याजदर कपात करण्यासाठी कसलाही दबाव नाही. उलट विकास दर इतक्या उच्च पातळीवर असताना महागाई कमी असली तरी रिझर्व बँकेने आता व्याजदर कपात करणे बरोबर होणार नाही असे मत बर्याच पतमानांकन संस्थांनी व्यक्त केले आहे. घाऊक महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. या महागाईचा दर किरकोळ महागाई पेक्षा कमी पातळीवर आहे.





