Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंवर उद्धव ठाकरेंनी सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणात यश संपादन केले तर मविआला मोठा फटका बसला. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.
या निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यवर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार उपस्थितीत होते. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली.
आदित्य ठाकरेंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी
महाविकासाआघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे. तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय घेतले जाणार आहेत.





