‘सिल्वर ईटीएफ’वरील निर्बंध हटवले; टाटा म्युच्युअल फंडाकडून गुंतवणुकीस ‘ग्रीन सिग्नल’
Updated On:

नवी दिल्ली – टाटा म्युच्युअल फंडाने सिल्वर ईटीएफ फंडात पुन्हा गुंतवणूक स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर या ईटीएफ फंडातील गुंतवणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वत होत आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणूक स्वीकारण्यास सुरुवात केली असल्याचे या कंपनीने नमूद केले आहे.
चांदीच्या बाजारातील परिस्थिती प्रचंड अस्थिर झाल्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी ही गुंतवणूक स्वीकारणे थांबविण्यात आले होते. गुंतवणूकदारांचे आणि कंपनीचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र परिस्थिती वेगाने सुधारत आहे. चांदीच्या दरातील अस्थिरता कमी झाली आहे. त्यामुळे आम्ही काम पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने एका पत्रकात नमूद केले आहे.





