जम्मू कश्मीरमध्ये आजपासून पुन्हा निर्बंध
Updated On:

श्रीनगर – जम्मू-कश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये करोना विषाणू संसर्ग आणि मृतांचा वाढता आकडा पाहता अनेक भागांत सोमवारपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये करोनाबाधितांचा आकडा 10 हजार पार गेला आहे.
श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इकबाल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, करोनाबाधितांची संख्या अधिक असलेले भाग कंटेन्मेंट झोन बनविले आहे. या झोनमध्ये कडक नियमांचे पालन केले जाणार आहे. तर स्थानिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे अपील त्यांनी केले आहे.
सोमवारपासून श्रीनगरमधील 68 भागांत पुन्हा निर्बंध लागू केले जाणार आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. करोनाच्या स्थितीचे परीक्षण करून गरजेनुसार निर्बंधात शिथिलता दिली जाणार आहे.





