वाघोली (पुणे) – केसनंद (ता. हवेली) येथे जय महाराष्ट्र महिला बचत गटाच्या अध्यक्षा अलकाताई सोनवणे, सदस्या सुनंदा ढवळे यांनी महिलांना साडी-चोळी देऊन महिल दिनानिमित्त महिलांचा सन्मान केला.
महिलांचे समाजातील स्थान आणि भूमिका खूप मोठी आहे. त्यामुळे महिलांनी एकत्रित येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करावी, असे आवाहन अलकाताई सोनवणे यांनी केले. याप्रसंगी जय महाराष्ट्र महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी 1 मुलगी व 2 मुली असणाऱ्या सर्व मातांचा सत्कार केला.
यावेळी जय महाराष्ट्र महिला बचत गटाचे सदस्य संध्या वाव्हळ, सुनंदा ढवळे, मनीषा गायकवाड, रूपाली लक्का, राणी कोकरे, रुपाली जाधव, हर्षदा गायकवाड, सीमा गायकवाड, प्रिया मोरे, अर्चना बेलकर, अनुराधा धनगुळवार, उषा गायकवाड, गौरी गायकवाड, अजंना जाधव, पुष्पा गायकवाड उपस्थित होत्या.