Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचे नाव समोर येताच तत्कालीन अन्न व नागरीपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रीपद जाऊन पाच महिने लोटल्यानंतरही मुंडे यांनी मलबार हिल परिसारतील ‘सातपुडा’ हा शासकीय बंगला सोडलेला नाही. इतकेच काय तर मुंडे यांच्याकडील दंडाची रक्कम ४२ लाख रूपये झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरीपुरवठा मंत्रालय छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आले. २३ मे रोजी सातपुडा हा बंगला भुजबळ यांना देण्याचा शासकीय आदेश काढण्यात आला. पण पाच महिन्यात मुंडे यांना बंगला सोडा, अशी कोणतीही सरकारी नोटीस पाठवण्यात आली नाही. धनंजय मुंडे यांच्याकडून सरकारी बंगला खाली न करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला कोणतेही कारण दिलेले नाही. Dhananjay Munde | १५ दिवसात सरकारी बंगला सोडावा लागतो दरम्यान, मंत्रिपद सोडल्यानंतर १५ दिवसात सरकारी बंगला सोडावा लागतो. धनंजय मुंडे यांनी ४ मार्च २०२५ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी २० मार्चपर्यंत सातपुडा बंगला सोडायला हवा होता. पण धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करून सरकारी बंगला काही काळ वापरण्यासाठी परवानगी घेतली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी अद्याप हा बंगला रिकामा केलेला नाही. Dhananjay Munde | हेही वाचा : ‘मालेगाव फाईल्स’ सिनेमा झाला पाहिजे, कारण काँग्रेसने फेक नेरटीव्ह पसरवले होते…; भाजप खासदाराची मागणी