शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांचा राजीनामा

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे व उपसभापती विश्वास ढमढेरे या दोघांनी आपले सभापती व उपसभापती पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
2017 ला शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत पॅनलचे जास्त उमेदवार निवडून आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार यांच्या यांच्या आदेशानुसार शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती हे राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत दसगुडे सभापती तर उपसभापती विश्वासराव ढमढेरे हे झाले होते.
सभापती शशिकांत दसगुडे व उपसभापती विश्वासराव ढमढेरे व संचालक मंडळ यांच्या काळात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठी प्रगती केली आहे. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्ज फेडून, काटकसरी करून ती नफ्यात आणण्याचे काम केले असल्याचे रवींद्र काळे यांनी सांगितले. परंतु पक्षाच्या या धोरणानुसार इतरांनाही संधी देण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या सूचनेनुसार सभापती शशिकांत दसगुडे व उपसभापती विश्वासराव ढमढेरे यांनी तालुका अध्यक्ष रवींद्र काळे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये इतर संचालकांना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी संधी मिळणार आहे याबाबत निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार घेणार आहेत.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शाशीकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. इतर संचालकांना संधी मिळावी या हेतुने राजीनामा घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे सभापती शशीकांत दसगुडे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे उपस्थित होते.






