Reserve Bank Of India : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना RBIने केला रद्द; का करण्यात आली नेमकी कारवाई?
Reserve Bank Of India :

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे. तर आणखी एका बँकेला आर्थिक दंड ठोठावला आहे. शिरपूर मर्चंट बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध आणले आहेत. या बँकेचा परवाना करत बँकेचे कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरबीआयकडून द शिरपूर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिरपूर या बँकेचा परवाना 2 एप्रिलच्या आदेशानं रद्द करण्यात आला आहे. आरबीआयनं ही कारवाई बँकिंग नियमन कायदा 1949 च्या सेक्शन 22 आणि सेक्शन 56 चा वापर करत ही कारवाई केली आहे.
आरबीआयकडून का करण्यात आली कारवाई? Reserve Bank Of India
आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बँकिंग कायद्यांच्या विविध कलमांनुसार द शिरपूर मर्चेंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिरपूर या बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींची पुर्तता करण्यास बँक अपयशी ठरली. बँकेचे कामकाज सुरु ठेवणे ठेवीदारांवर अन्यायकारक ठरेल, असे आरबीआयने नमूद केले आहे.
बँकेची सध्याची आर्थिक स्थिती ठेवीदारांची पूर्ण रक्कम देण्याइतकी चांगली नाही. सार्वजनिक हितासाठी बँकेचे कामकाज बंद करण्यात आले आहे. Reserve Bank Of India
आरबीआयच्या आदेशानुसार द शिरपूर मर्चेंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिरपूरचा परवाना रद्द झाल्याने त्यांना ठेवी स्वीकारणे, ठेवीदारांच्या ठेवी परत करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. बँक अवसायनात काढल्यानंतर या बँकेत ज्यांच्या ठेवी आहेत त्यांच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसीचे संरक्षण मिळेल.
बँकेकडून मिळालेल्या डेटानुसार बँकेचे ९९.७ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवी पूर्णपणे परत मिळण्यास पात्र असतील. डीआयसीजीसीने या बँकेच्या ठेवीदारांना ४८.९५ कोटींची रक्कम ३१ जानेवारीपर्यंत परत केली आहे. Reserve Bank Of India
आरबीआयकडून कोणत्या बँकेला दंड?
तर डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अमरावती या बँकेला आरबीआयनं गुंतवणुकीसंदर्भातील नियमांची पूर्तता न झाल्यानं 1 लाख 9 हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच या बँकेने ग्राहकांकडून निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क एनईएफटी व्यवहारांवर आकारल्याचेही समोर आले आहे.
हेही वाचा:




