रिझर्व्ह बँकेची येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई; नेमकं काय घडलं?

RBI Action On Yes Bank And ICICI Bank| रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBI कडून दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच या दोन्हीही बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
येस बँकेवर का करण्यात आली कारवाई ?
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेने 2022 या वर्षात अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांच्या नावे काही अंतर्गत खाती उघडली आणि चालवली होती. तसेच झिरो बॅलन्स खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक नसल्याने येस बँकेने शुल्क वसूल केले होते. त्यामुळे या बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेवर ग्राहक सेवा आणि कार्यालयीन खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसेच कार्यालयीन खात्यांमधून देखील बेकायदेशीर कामे केली जात असल्याचे समोर आले आहे. येस बँकेला 91 लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आयसीआयसीआय बँकेवर कारवाई ?
तर आयसीआयसीआय बँक कर्ज आणि ऍडव्हान्सशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. यासाठी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बँकेने अपूर्ण तपासाच्या आधारे अनेक कर्ज मंजूर केले, त्यामुळे बँकेला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. RBI Action On Yes Bank And ICICI Bank|
आयसीआयसी बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेत काही चुका आढळून आल्या होत्या. बँकेने काही प्रकल्पांची व्यवहार्यता आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता याचे विश्लेषण न करता कर्ज मंजूर केल्याचे समोर आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. RBI Action On Yes Bank And ICICI Bank|





