Pimpri : खालापूर तालुक्यात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

खालापूर : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी हरकती घेतल्यावर पुन्हा आरक्षण सोडत तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. सरपंच पदासाठी जाहीर झालेल्या सोडतीमुळे 22 ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे. तर साजगाव, माडप, वावोशी आदि ग्रामपंचायतीचे आरक्षण बदले आहे.
खालापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायत पैकी 40 ग्राम पंचायतीच्या निवडणुका मागील दोन वर्षांत पूर्ण झाल्या असून उर्वरित 5 ग्राम पंचायतीचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हे थेट सरपंच पदाचे आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी आहे. ग्रुप ग्रामपंचायत साजगांव येथे अनुसूचित जाती तर तुपगाव हे अनुसूचित जाती महिला वर्गासाठी पडले आहे.
अनुसूचित जमाती साठी माडप, वावोशी, बोरगावखुर्द, वावर्ले, जांबरुंग तर महिला अनुसूचित जमातीसाठी कलोते, नारंगी, वरोसे, उंबरे, दुरशेत या ग्रामपंचायत यांची सोडत निघाली आहे. तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला चावणी, टेंभरी, तांबाटी, होनाड, चांभार्ली, शिरवली, नागरिकांच्या मागास प्रवर्ग गोरठण बुद्रुक, ठाणेन्हावे, इसांबे, नंदनपाडा, जांभिवली, देवन्हावे, टेंभरी, तांबाटी या ग्रामपंचायत यांची सोडत निघाली आहे.
सर्व साधारण मधून 21 सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात महिलांसाठी बिडखुर्द, वडगाव, आसरे, नावंढे, वावंढळ, माणकिवली, हाळखुर्द, सावरोली, वडवळ, लोधीवली या ग्रामपंचायत यांची सोडत निघाली. तर खानाव, खरीवली, आपटी, नडोदे, चौक, होराळे, आत्करगाव, चिलठण, मांजगाव, वासंबे, कुंभिवली या ग्रामपंचायत सर्व साधारण जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
आरक्षण सोडत जाहीर करताना तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप कराड, नायब तहसीलदार सुधाकर राठोड उपस्थित होते. तसेच मागच्या आरक्षण सोडत अनेकांची हिरमोड झाला होता. हरकती घेतल्यावर पुन्हा आरक्षण सोडतीच्या दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीचे राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. अनेकांना काय आरक्षणाबाबत पडणार याची उत्सुकता अखेर संपली असून इच्छुक उमेदवार आपआपल्या ग्रामपंचायतीत कामाला लागणार आहेत.





