पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे राजकीय वर्तुळात काही जण आनंदात आहे तर काही जणांना झटका लागला आहे. महापालिकेच्या ३२ प्रभागांपैकी २० प्रभागांमध्ये अनुसुचित जातीसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. यामध्ये २० जागांपैकी १० जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. तर अनुसचित जमाती (एसटी) साठी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ३ प्रभाग निश्चित करण्यात आले. नियमानुसार २ प्रभागामध्ये महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २९ आणि ३० या दोन प्रभागांमध्ये महिलांसाठी जागा राखीव असणार आहे. आरक्षण सोडत प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) सोडत प्रक्रिया पार पडली. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नेमून देण्यात येईल. यानुसार शहरातील ३२ प्रभागातील जागा निश्चित करण्यात आल्या. तर उर्वरित दोन जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मध्ये ओबीसीसाठी जागा राखीव करण्यात आली. त्यानंतर ज्या प्रभागातील नागरिकांचा मागास प्रवर्गच्या दोन जागा राखीव होतील त्या प्रभागामध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी थेट राखून ठेवण्यात आली. तसेच ज्या प्रभागात अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीसाठी जागा आहे, मात्र ती जागा महिलांसाठी आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील जागा थेट पद्धतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव निश्चित करण्यात आली. तर उर्वरित सहा जागी सोडत घेण्यात आली. सर्वसाधारण महिलांसाठी ३५ जागा सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्यासाठी ज्या प्रभागामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये महिलांचे आरक्षण निश्चित झाले आहे. तसेच चार सदस्यीय प्रभागामध्ये दोन पेक्षा जास्त महिला येणार नाही याचा विचार करून सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानुसार, एकूण ३५ प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांचे आरक्षण आहे. एकूण सदस्य – अनुसुचित जाती(एससी) – अनुसुचित जमाती (एसटी) – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – सर्वसाधारण १२८ – २०- ०३- ३४- ७१ यापैकी महिलांसाठी आरक्षित जागा ६४ – १० – ०२ – १७ – ३५ असे आहे आरक्षण प्रभाग – परिसर – अ – ब – क – ड १ – चिखली गावठाण, मोरेवस्ती – ओबीसी – सर्वसाधारण महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव २- बोऱ्हाडेवाडी, कुदळवाडी – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव – अराखीव ३ – चऱ्होली, मोशी गावठाण,वडमुखवाडी,चोवीसावाडी – अनुसूचित जाती महिला – ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव ४ – दिघी, बोपखेल – अनुसुचित जाती महिला – अनुसूचित जमाती – ओबीसी महिला – अराखीव ५- गवळीनगर, चक्रपाणी वसाहत – ओबीसी महिला- ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव ६- धावडेवस्ती, भगतवस्ती – ओबीसी महिला – ओबीसी- सर्वसाधारण महिला – अराखीव ७ – भोसरी गावठाण, सॅन्डवीक कॉलनी – ओबीसी – सर्वसाधारण महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव ८ – इंद्रायणीनगर, गवळीमाथा – अनुसूचित जाती – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव ९- नेहरूनगर, खराळवाडी, गांधीनगर – अनुसूचित जाती -ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव १०- शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी – अनुसूचित जाती महिला – ओबीसी महिला – अराखीव – अराखीव ११- पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल – अनुसूचित जाती – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव १२ – तळवडे गावठाण, रुपीनगर – ओबीसी – सर्वसाधारण महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव १३ – निगडी गावठाण, यमुनानगर – अनुसूचित जाती – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव १४- चिंचवड स्टेशन, मोहननगर – ओबीसी – सर्वसाधारण महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव १५- आकुर्डी गावठाण, गंगानगर – ओबीसी – सर्वसाधारण महिला -सर्वसाधारण महिला – अराखीव १६- मामुर्डी, किवळे – अनुसुचित जाती – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव १७- बिजलीनगर, प्रेमलोक पार्क – अनुसूचित जाती महिला – ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव १८ – चिंचवड गावठाण, केशवनगर – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव – अराखीव १९ – उद्योगनगर, विजयनगर, पिंपरी कॅम्प – अनुसूचित जाती महिला – ओबीसी महिला – अराखीव – अराखीव २०- संत तुकारामनगर, कासारवाडी – अनुसूचित जाती – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव २१- पिंपरीगाव, मिलिंदनगर – अनुसूचित जाती महिला – ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव २२ – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव – अराखीव २३ – थेरगाव गावठाण, पडवळनगर – अनुसूचित जाती महिला- ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव २४ – थेरगाव दत्तनगर, गुजरनगर – ओबीसी- सर्वसाधारण महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव २५- वाकड, पुनावळे, ताथवडे – अनुसूचित जाती – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव २६ – पिंपळे निलख, कस्पटेवस्ती – अनुसूचित जाती – ओबीसी महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव २७- काळेवाडी, रहाटणी गावठाण – अनुसूचित जाती – ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव २८- पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन – ओबीसी – सर्वसाधारण महिला – सर्वसाधारण महिला – अराखीव २९ – पिंपळे गुरव, सुदर्शननगर – अनुसूचित जाती महिला – अनुसूचित जमाती महिला – ओबीसी – अराखीव ३० – दापोडी, फुगेवाडी – अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती महिला – ओबीसी – सर्वसाधारण महिला ३१ – सांगवी विनायकनगर, उरो रुग्णालय – अनुसूचित जाती महिला – ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव ३२ – सांगवी गावठाण – अनुसूचित जाती महिला – ओबीसी – सर्वसाधारण महिला – अराखीव