‘घटना समिती अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी दिलेल्या योगदानाबाबत हा देश त्यांचा कायमच ऋणी राहील. आजच्या दिवशी विधिज्ञ बी. एन. राऊ यांचेही राज्यघटनेतील योगदानासाठी स्मरण केले पाहिजे. या घटनेमध्ये देण्यात आलेली दृष्टी ही आपल्या प्रजासत्ताकाची मार्गदर्शक आहे. या काळात एकेकाळी गरीब आणि अशिक्षितांचा देश असलेला भारत आता जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने पाऊले टाकत आहे. राज्यघटनेतील सामुदायिक शहाणपणाखेरीज हे शक्य झाले नसते.’
Republic Day 2023 Live updates : ‘हा देश बाबासाहेब आंबेडकरांचा कायम ऋणी राहील’
Updated On:

नवी दिल्ली – ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. राष्ट्रपती भवनाच्या निवेदनानुसार, संध्याकाळी ७ वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) च्या सर्व राष्ट्रीय नेटवर्कवर आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले गेले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासीयांना उद्देशून म्हणाल्या….





