शिरूर -शिरूर तालुक्यातील कारेगाव औद्योगिक वसाहत, अण्णापूर, निमोणे, कवठे येमाई या चार गावांतील 31 जणांपैकी 29 जणांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. कवठे येमाई येथील दोनजणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
कारेगाव औद्योगिक वसाहतीतील मोठ्या कंपनीतील कर्मचारी, अण्णापूर, निमोणे येथील गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कवठे येमाई येथील दोन अहवाल येणे बाकी आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्याला या अहवालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. करोनामुक्तीच्या वाटेवर आहे.
कारेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कात आलेले 11 कर्मचारी, अण्णापूर येथील 52 वर्ष पुरुषाच्या संपर्कात आलेले नऊजण, कवठे येमाई येथील ससून रुग्णालयात कामाला असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले सातजण, असे एकूण 29 करोना तपासणी अहवालात निगेटिव्ह आले आहेत.