आरबीआयकडून मोठा निर्णय ; व्याजदराबाबत दिली ‘ही’ महत्वाची माहिती, वाचा सविस्तर

Repo Rate Cut । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समिती (MPC) ने ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेली बैठकीनंतर रेपो दर जाहीर करण्यात आला. सलग तीन वेळा कपात केल्यानंतर, यावेळी व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला RBI गव्हर्नर बनलेले संजय मल्होत्रा यांचे रेपो दरावरील हे चौथे धोरणात्मक विधान आहे. या वर्षी आतापर्यंत तीन वेळा रेपो दरात कपात करण्यात आली आहे, तरीही, घर खरेदीदार आणि बँक कर्जदारांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती.
व्याजदरात कोणताही बदल नाही Repo Rate Cut ।
संजय मल्होत्रा यांनी माध्यमांशी संवाद साधताना जागतिक व्यापार परिस्थितीचा संदर्भ देत देशातील आर्थिक गती राखण्यासाठी RBI ने अनेक योग्य पावले उचलली आहेत आणि अर्थव्यवस्थेची स्थिती मजबूत आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील सुरू असलेल्या व्यापार चर्चेवर ते म्हणाले की, परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत RBI कोणतीही घाईघाईने पावले उचलू इच्छित नाही.
संजय मल्होत्रा म्हणाले की, MPC ने हा निर्णय एकमताने घेतला आहे. विशेषतः वर्षाच्या सुरुवातीला १०० बेसिस पॉइंट कपात केल्यानंतर, आता कोणताही बदल आवश्यक वाटत नाही. यासोबतच, येत्या काळात महागाई वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
६.५% विकास दराचा अंदाज Repo Rate Cut ।
भारताचा वास्तविक जीडीपी २०२६ या आर्थिक वर्षासाठी कोणताही बदल न करता ६.५ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. यासोबतच, रिझर्व्ह बँकेने संपूर्ण वर्षासाठी तिमाहीनिहाय अंदाज अशा प्रकारे जाहीर केले – पहिल्या तिमाहीत ६.५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.७ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.३ टक्के.
यापूर्वी, आरबीआयने या वर्षी फेब्रुवारीमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, जी गेल्या पाच वर्षांतील पहिली दिलासा होती. त्यानंतर, रेपो दर ६.२५% झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये आणखी २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली. त्यानंतर, जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने अनपेक्षितपणे रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी केला, ज्यामुळे तो ५.५% वर आला.




