RBI ची मोठी भेट ! रेपो दरात सलग तिसऱ्यांदा भरघोस कपात ; सर्व प्रकारचे कर्ज अन् EMI होणार स्वस्त

Repo Rate Cut। ज्यांनी सर्व प्रकारचे कर्ज घेतले आहे किंवा कर्जावर ईएमआय भरत आहेत त्यांच्यासाठी आरबीआयने एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त रेपो दरात कपात केली. ४ जूनपासून सुरू झालेल्या आरबीआयच्या चलन समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आज ही घोषणा करताना ५० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.५० टक्के मोठी कपात जाहीर केली आहे.
सर्व प्रकारची कर्जे आणि ईएमआय स्वस्त होणार Repo Rate Cut।
यानंतर, रेपो रेटचे प्रमाण आता ५.५ टक्क्यांवर आले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर, कार आणि गृहकर्जांसह सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. रेपो दर कमी करताना, आरबीआयने,”त्यांच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध होतील. जागतिक विकासाच्या मंद गतीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल. देशांतर्गत मागणी आणखी वाढेल” असे म्हटले आहे.
#WATCH | RBI Governor Sanjay Malhotra says, “After having reduced the policy repo rate by 100 basis points in quick succession since February 2025, the MPC also felt that under the present circumstances, the MPC is now left with very limited space to support growth. Hence, the… pic.twitter.com/EkzFF7Dn6m
— ANI (@ANI) June 6, 2025
गेल्या सहा महिन्यांत आरबीआयने रेपो दरात सलग तिसरी कपात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, फेब्रुवारीमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती आणि त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती. त्यानंतर रेपो दर ६ टक्क्यांवर आला.
अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा Repo Rate Cut।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच अॅल्युमिनियम आणि स्टीलवरील कर दर ५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, अशा वेळी तिसऱ्यांदा रेपो दर कमी करण्याचा आरबीआयचा हा निर्णय घेण्यात आला. भारत या दोन्ही उत्पादनांचा एक प्रमुख निर्यातदार राहिला आहे. अशा परिस्थितीत, हा भारतासाठी एक मोठा धक्का मानला जात होता.




