देशात पुन्हा मोदी सरकारची पुनरावृत्ती होवो – देवेंद्र फडणवीस

मुंबई – चैत्र शुद्ध प्रतिपदा मराठी नवं वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी गुढीपूजन केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पत्नी अमृता, मुलगी दिवीजा देखील उपस्थित होते. मराठी मराठी नवं वर्षाच्या शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा मोदी सरकारची पुनरावृत्ती होवो, तसेच राज्यात चांगल्या पावसाने लोकांना दिलासा मिळो, अशी प्रार्थना केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गुढीपाडव्यानिमित्त आज सकाळी मुंबई येथील निवासस्थानी गुढी उभारून नूतन वर्षाचे स्वागत केले !
Glimpses of #GudiPadwa celebrations family at our Mumbai residence ‘Varsha’ , this morning. pic.twitter.com/OM00NUrePL
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2019





