इंदिरा गांधी उड्डाणपुलाची दुरुस्ती वेळेत करा – आमदार बनसोडे
Updated On:

पिंपरी -इंदिरा गांधी उड्डाणपुलाची डागडुजी मागील एक वर्षापासून संथगतीने सुरू आहे. उड्डाणपुलावरून शगुन चौकात जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी बंद आहे. हे दुरुस्तीचे काम पुढील 50 दिवसात पूर्ण करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांनी लक्ष घालावे अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.
पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या व्यापाऱ्यांची बैठक पिंपरीमध्ये मंगळवारी अध्यक्ष व उद्योजक श्रीचंद आसवानी आणि प्रतिनिधींनी आयोजित केले होती. यावेळी पिंपरी कॅम्प मधील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार बनसोडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी उपमहापौर व नगरसेवक डब्बू आसवानी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, नीरज चावला, सुनील चूगाणी, प्रकाश रतनानी, नारायण पोपटाणी, अनिल आसवानी आदींसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.





